शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:39 IST

महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे.

नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत.महाविद्यालयाच्या शिक्षणक्रमातील दुसºया वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मराठी तरुणांकडून मातृभाषेचा वापर या विषयावर नाशिक शहरात सर्वेक्षण केले. मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान ९८ टक्के तरुणांना आहे. मात्र मराठी भाषेला सध्या अभिजात दर्जा मिळावा यासाठी बरीच चळवळ सुरू असली तरी अभिजात मराठी म्हणजे काय याबाबत युवावर्ग अनभिज्ञ आहे. सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली आहे. इतर भाषांच्या तुलनेत मराठी अवघड असल्याचे ४९ टक्के तरुणांचे मत असले तरी पदवीस्तरावर मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे ७६ टक्के युवकांनी मान्य केले आहे.मराठीचा वापर वाढविण्यासाठी आणि ती जगवण्यासाठी राज्यात सर्वच भाषिकांसाठी मराठी सक्तीची करावी असे ६८ टक्के युवकांचे मत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. मातृभाषेत हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शब्दांचा वापर वाढल्याचे ८४ टक्के युवकांचे मत आहे. तसेच चित्रपट आणि मालिकेतील बोलीभाषेचा परिणाम मातृभाषेवर होतो, असे ८८ टक्के युवकांनी सांगितले. सध्या अनेक मालिकांमधील चालतय की, बोलतोय की, चालेल की, असे शब्द वापरले जातात. याशिवाय सोशल मीडियावरील मराठीदेखील प्रमाण भाषा बिघडविण्यास कारण असल्याचे मत ५३ टक्के युवकांनी व्यक्त केले. मराठी भाषेत अश्लील शब्दांचा वापर होत असल्याचे ८५ टक्के मत आढळले. यावरून युवकांच्या म्हणजेच भावीपिढीतील मातृभाषेच्या पालनपोषणासाठी ही धोक्याच घंटा असल्याचेदेखील या कौलातून स्पष्ट झाले.पत्रकारिता विभागाच्या प्रमुख उपप्राचार्या डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.मराठी भाषेला अभिजात म्हणून दर्जा मिळाला तर नेमके काय फायदे होतील हे सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांना माहिती नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीचे निकष युवकांना माहिती नाही, त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यास संवादासाठी मराठीचा वापर वाढेल जागतिक स्तरावर मान्यता मिळेल, ती व्यवहार भाषा होऊ शकेल असे अनेक गैरसमज या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मराठीचे शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले खरे; परंतु मराठी राजभाषाच नव्हे तर ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे मतही युवा वर्गाने व्यक्त केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयmarathiमराठी