शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कॉँग्रेसच्या हाती आघाडीची चावी

By admin | Updated: January 22, 2017 00:44 IST

राष्ट्रवादी अगतिक : तडजोड करण्याची भूमिका

नाशिक : भ्रष्टाचार-गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने घड्याळ्याची टिकटिक हृदयाचे ठोके वाढवत असताना महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसच्या टेकूने पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आघाडी करण्यास राष्ट्रवादी अगतिक बनली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेससोबत आघाडी करण्यास आम्ही उत्सुक असून, त्यासाठी एक पाऊल नेहमीच पुढे राहणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आघाडीची चावी कॉँग्रेसच्या हाती असल्याने घडाळ्याचे काटे उलटे फिरवायचे की सुलटे, याचा उलगडा येत्या काही दिवसांत कॉँग्रेसकडून होणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, कॉँग्रेसमध्ये राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून मतभेद असल्याने आघाडीचे घोंगडे भिजत पडले आहे. आघाडी करण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय नाही अन्यथा पक्षाचे आहे ते अस्तित्व नामशेष होण्याची भीती राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उभय स्तरावर चर्चा सुरू आहे. परंतु, कॉँग्रेसने आघाडीबाबत संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेत राष्ट्रवादीची धडधड वाढविली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार जयंत जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, कॉँग्रेससह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे. पक्षाचे दरवाजे त्यासाठी खुले असून, पक्ष एक पाऊल पुढेच असणार आहे. शिवसेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणे गरजेचे आहे. पक्षाची भावना ही तोडायची नसून जोडायची आहे. कॉँग्रेससोबत झालेल्या चर्चेत काही मुद्द्यांवर एकमत होऊ शकलेले नाही. पॅनलनुसार निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार रिंगणात उतरविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून त्याबाबत बारकाईने विचार होण्याची गरज असल्याचेही जाधव व ठाकरे यांनी सांगितले.