शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

By admin | Updated: February 11, 2017 23:46 IST

सटाण्यात आघाडीचे वाढले संख्याबळ

सटाणा : येथील पालिकेत गेल्या डिसेंबर महिन्यात शहर विकास आघाडीने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आघाडीचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सरू केले असून, आज अपक्ष नगरसेवक त्यांना जाऊन मिळाल्याने आघाडीची संख्या आता आठवरून नऊवर गेली आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग सहामधून अपक्ष निवडून आलेल्या संगीता संदीप देवरे यांनी आज शहर विकास आघाडीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून त्यांची आघाडीच्या गटात नोंदणी करण्यात आली. देवरे आघाडीत सहभागी झाल्याने त्यांचे नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे, नगरसेवक बाळा बागुल, डॉ. विद्या सोनवणे, भारती सूर्यवंशी यांनी सत्कार करून स्वागत केले. प्रभाग क्रमांक आठमधून निवडून आलेल्या सुवर्णा नंदाळे यांनी कायदेशीर प्रक्रि या राबवून आघाडीचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने अध्यक्षपदासह आघाडीचे संख्याबळ आठवर गेले. आज पुन्हा आघाडीचे संख्याबळ आठवर असताना त्यांना देवरे जाऊन मिळाल्याने आघाडीचे संख्याबळ नऊवर गेले आहे.२००१ च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर यंदा दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना अक्षरश: चारीमुंड्या चित केले होते; मात्र नगरसेवकपदावर एकूण एकवीस जागांपैकी अवघ्या सहा जागा आघाडीला मिळाल्या होत्या. त्यामुळे पालिकेत त्रिशंकू परिस्थिती होती. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार संजय चव्हाण यांनी आघाडीकडे प्रस्ताव सादर केला होता.