शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी नेत्यांचे ठाण, नाशकात निवासस्थान

By admin | Updated: February 3, 2017 01:05 IST

तात्पुरते सदन : गिरीश महाजन, नरेंद्र पवार यांचे शहरामध्ये वास्तव्य

नाशिक : सर्वच राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आता नाशिकमध्ये ठाण मांडत असून, त्यासाठी काहींनी तर तात्पुरत्या स्वरूपात सदनिका वापरण्यास घेतल्या आहेत. विशेष म्हणजे एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेदेखील शहरात दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभागातच दोन सदनिका भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.निवडणुका आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, एकदा सत्ता दिली की नाशिकला ठाण मांडून प्रश्न सोडवू आणि विकास करू, असे सांगतात. तथापि, आता निवडणुकीच्या कामासाठीच नाशिकमध्ये ठाण मांडावे लागणार असून तशी तयारी केली जात आहे. निवडणुकीसाठी ज्यांच्याकडे सूत्रे आहेत, असे नेते मुंबई, जळगाव, अहमदनगर, ठाणे परिसरातील आहेत. भाजपाचे नेते तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय निवासस्थानी वास्तव्य करणे शक्य नसल्याने त्यांनी त्र्यंबकरोडवर स्प्लेंडर रेसिडेन्सीत एका कार्यकर्त्याच्या सदनिका वापरण्यासाठी घेतली आहे. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाच्या पलीकडे तेथेच निवडणूक हालचालीचे केंद्र असून तेथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांच्या बैठका होत आहेत. भाजपाचे आणखी एक कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली असून त्यासाठी त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिराजवळ सदनिका वापरण्यासाठी घेतली आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांचादेखील असाच शोध सुरू केल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपाचा कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने प्रभाग १५ आणि प्रभाग तीनमध्ये खास निवासस्थान भाड्याने घेतल्याचे समजते. भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या सुपुत्रांना पराभूत करण्यासाठी सदरचा नेता ठाण मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नेत्यांच्या मुक्कामामुळे नाशिकच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)