शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द झाल्यास पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त

By admin | Updated: September 8, 2015 23:31 IST

निर्णयाची प्रतीक्षा : पालिकेला ३० कोटींचा फटका

नाशिक : राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यास नाशिक महापालिका क्षेत्रात पेट्रोल सुमारे अडीच रुपये, तर डिझेल सुमारे दोन रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा पेट्रोलपंपचालकांकडून केला जात आहे. दरम्यान, इंधनावरील एलबीटीच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला वार्षिक ३० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत असतो. एलबीटी रद्द झाल्यास महापालिकेला आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.राज्य शासनाने दि. १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. परंतु पेट्रोल व डिझेल यावरील एलबीटी कायम ठेवला. पेट्रोल व डिझेल यावरील एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी फेडरेशन आॅफ महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (फामपेडा) गेल्या सोमवारी (दि.७) एक दिवस बंदची हाक दिली होती. परंतु, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बंदपूर्वीच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ६ आॅक्टोबरपूर्वी पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यासंबंधी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे फेडरेशनने राज्यातील २५ महापालिका क्षेत्रात पुकारलेला बंद मागे घेतला. आता राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने पेट्रोलपंपचालकांना निर्णयाची प्रतीक्षा असून, सर्वांचे डोळे ६ आॅक्टोबरकडे लागले आहेत. दरम्यान, नाशिक महापालिकेकडून पेट्रोल व डिझेलवर ३ टक्के एलबीटी आकारला जातो. त्यातून महापालिकेला वार्षिक सुमारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. राज्य सरकारने इंधनावरील एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास पालिकेला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. सरकारकडून या उत्पन्नाच्या मोबदल्यात किती अनुदान मिळेल आणि मिळाले तरी ते कधी मिळेल याची खात्री महापालिकेच्या प्रशासनालाही नाही. त्यामुळे पन्नास कोटी रुपयांच्या वर उलाढालीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. मात्र, इंधनावरील एलबीटी रद्द झाल्यास नाशिक शहरात पेट्रोल सुमारे अडीच रुपयांनी, तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा पेट्रोलपंपचालकांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी) ग्राहकांमध्ये मात्र साशंकताराज्य सरकारने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर खाली येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, बाजारपेठेत वस्तूंचे दर ‘जैसे थे’ असल्याने ग्राहकांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द झाल्यास इंधन स्वस्त होणार असल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबत ग्राहकांमध्ये साशंकता आहे. इंधन कंपन्यांकडून करमाफीचा लाभ उठविला जाईल; परंतु त्यांच्याकडून किमतीत घट केली जाण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.