शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावसह परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात

By admin | Updated: October 31, 2016 01:10 IST

आतषबाजी : रंगीबेरंगी विद्युत रोषणाई

मालेगाव : शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने व अत्यंत उत्साहात दिवाळी सणानिमित्त नागरिकांनी मुहूर्त साधून अत्यंत मनोभावे लक्ष्मीपूजन केले. शहरात गेल्या आठवडाभरापासून दीपावली सणाची लगबग वाढली असून, बाजारात खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी झाली आहे. विविध शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाकड जाण्याची लगबग सुरू आहे. शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. संगमेश्वरसह मोसमपूल भागात झेंडूच्या फुलांसह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरासह बाहेरगावच्या लोकांची वर्दळ वाढल्याने मोसमपूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने व दुकानांमध्ये झेंडूंच्या फुलांचे तोरण लावून विधीवत पूजन करीत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. व्यापारी व महिलावर्गाकडून रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन सुरू होते. दरम्यान, येत्या सोमवारी मराठी नववर्ष ‘पाडवा’ तसेच मंगळवारी ‘भाऊबीज’ असल्याने महिलांमध्ये माहेरी जाण्याची ओढ दिसून आली. शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रती नग असा होता. लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाऱ्या केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता. देवीच्या पूजेसाठी आसन, चुनरी, हळद, कुंकू, सुपारी, नारळ, अगरबत्ती, वात, कापूर, खारीक, बत्तासे, गुलाबजल आदि सामानाचे एकत्रित साहित्य याची विक्री किमान ४० ते ३५० रुपयांना होत आहे. पणत्या व आकाश कंदिलामुळे रोषणाईचा झगमगाट जाणवत होता. बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी झेंडू, शेवंती, गुलाब आदि फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले होते. (प्रतिनिधी)