शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकीसह लाखो रु पयांचा ऐवज लंपास कळवण : सेना पदाधिकाऱ्यालाही फटका; पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST

कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला.

ठळक मुद्देपोलिसांची शहरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणीकळवण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लांबविला. धाडसी घरफोडी झाल्याने नागरिक भयभयीत झाले असून, या घरफोड्यांचा पोलिसांनी तपास लावून कळवणकर जनतेला दिलासा द्यावा व पोलिसांची शहरात रात्रीची गस्ती वाढवावी, अशी मागणी कळवणकर जनतेने केली आहे. कळवण शहरातील नामदेव रघुनाथ लहारे हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या शहरातील शिवाजीनगर भागातील महालक्ष्मी कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील २० हजाराचे लॅपटॉप, ७० हजारांची रोकड, १५ हजारांची सोन्याची अंगठी, हजाराचे कडे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्याबरोबर त्याच रात्री शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ व विलास निंबा पाटील यांच्या दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही दुचाकी या हॅण्डल लॉक असताना चोरीस गेल्या आहेत. याबाबत कळवण पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधोर करीत आहेत.शहरातील शिवाजीनगर परिसरात नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने बहुतांशी नोकरदार बाहेरगावी गेले असल्याने शहरातील उपनगरातील अनेक घरे बंदच आहेत, याचा फायदा घेऊन चोरट्यांनी आपला मोर्चा कळवण शहराकडे वळविला आहे. टेहळणी करून बंद घरांचे दरवाजे फोडून यशस्वी घरफोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. भरदिवसा घरफोड्या होत असल्याने शहरातील नागरिक भयभयीत झाले असून, मागील वर्षी झालेल्या घरफोडींच्या तपासात कळवण पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असताना पुन्हा घरफोडी सत्र सुरू झाल्याने नागरिक भयभयीत झाले आहेत. त्यामुळे कळवण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांनी केली आहे.