शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंजवाड येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: October 29, 2014 22:17 IST

वाढती लोकसंख्या : पाणीप्रश्न सुटण्याची आशा

मुंजवाड : येथे राष्ट्रीय पेयजल (भारत निर्माण) योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ एन. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, सरपंच गणेश जाधव, उपसरपंच विजय सूर्यवंशी उपस्थित होते.दहा वर्षापूर्वीं गावाला जल स्वराज्य योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना साकारण्यात आली होती. त्यानंतर गावाचा विस्तार वाढला. सावतानगर व इंदिरानगर परसिरासह गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असे. तसेच उन्हाळ्यात जलस्वराज्य प्रकल्पाच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावत असल्याने तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी सरपंच गणेश जाधव व उपसरपंच विजय सूर्यवंशी यांनी जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६१ लक्ष रु.ची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नवीन विहिर, पाण्याची टाकी येथून सावतानगर व इंदिरानगर वसाहतीत जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजनप्रसंगी माजी पोलिसपाटील तुकाराम जाधव, माजी सरपंच सुशीला जाधव, गुलाब जाधव, दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील जाधव, रमेश निकम, खंडू पिंपळसे, एन. टी. जाधव, शंकर जाधव, हरिकांत सूर्यवंशी, शंकर पगारे, माजी सरपंच नंदू जाधव, देवीदास जाधव, ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे, निवृत्ती खैरनार, भिका जाधव आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)