नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर कुशावर्त मधील पाणी शुद्धीकरणासाठी बसविण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा शुभारंभ आज (दि.१७) सायंकाळी ४ वाजता अखिल भारतीय चर्तुसंप्रदाय अध्यक्ष योगाधिराज बर्फानी दादाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. त्र्यंबकेश्वर कुशावर्तमधील पाणी जलशुद्धीकरणासाठी संगमनेरच्या उल्हास, किरण व जीवन करवा बंधूंच्या वतीने प.पूज्य गगनगिरी महाराज यांच्या नावाने बसविलेले व इटलीहून आणलेले २५ लाखांचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे. करवा बंधूंनी उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र त्र्यंबकेश्वर नगरपालिका व मंदिर ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचा शुभारंभ आज सायंकाळी ४ वाजता अखिल भारतीय चतु:संप्रदाय अध्यक्ष योगाधिराज बर्फानी दादाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्राचा आज शुभारंभ
By admin | Updated: July 17, 2014 00:29 IST