महाराष्ट्र शासन कृषी विभाग इगतपुरीच्या वतीने ‘पिकेल ते विकेल’ या प्रकल्पांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेसाठी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या सीएसआर फंडातून कळसूबाई महिला बचतगट घोटी यांना लोखंडी रॅक, टेबल-खुर्ची, छत्री, वजन काटा इत्यादी साहित्यवाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतमाल विक्री स्टॉलच्या व घोटी येथे साहित्यवाटप उद्घाटन महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे महाव्यवस्थापक टॉम थॉमस, कैलास ढोकणे, जयंत इंगळे व तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी थॉमस यांनी कंपनीतर्फे यापुढेदेखील कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बचतगटांना मदत पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच कंपनीच्या आवारातदेखील बचतगटाने शेतमाल विक्री स्टॉल उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार पवार यांनी यावेळी ‘पिकेल ते विकेल’ अभियानांतर्गत बचतगटाचे महत्त्व आणि शेतकरी ते ग्राहक यांमधील साखळी जोडण्यात येईल याविषयी मार्गदर्शन केले. महिंद्रा कंपनीच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील दहा गटांना असे किट पुरविण्यात आले आहे.
यावेळी शिवम गोयल, प्रतीक पांडे, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी भास्कर गिते, चंद्रशेखर अकोले, अनिल मुडे, कृषी पर्यवेक्षक रामा दिघे, संजीव चव्हाण, किशोर भरते, कृषी सहाय्यक मोहन तागड, प्रियंका पांडुळे, रजनी चौधरी, बचतगटाच्या अध्यक्ष रंजना रायकर, स्वाती रंधवे आदी उपस्थित होते. (१८ घोटी १)
180821\18nsk_29_18082021_13.jpg
विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ