कळवण : वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत खºया अर्थाने प्रयत्न करणाºया स्व. दौलतराव अहेर यांचे स्वप्न आज पूर्णत्वास येत असले तरी त्यांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे, त्यांना खºया अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊस उत्पादक बांधवांनी वसाकालाच ऊसपुरवठा करून त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करावे, असे भावनिक आवाहन करताना आमदार डॉ. राहुल आहेर यांना अश्रू अनावर झाले.वसाकाच्या ३१व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. ७) माजी अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह ३१ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. वसाकाच्या गळीत हंगामाच्या माध्यमातून मोठ्या अध्यायाला सुरुवात होणार असल्याने कारखान्याचे भवितव्य पूर्णत: वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्याच हातात असून, कारखान्याच्या ऐतिहासिक पर्वाच्या जडणघडणीत कारखान्याशी निगडित असलेल्या सर्व घटकांनी प्रामाणिकपणे हातभार लावून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. यावेळी कळवण येथील ऊस उत्पादक शेतकरी गंगाधर पर्बत पगार यांनी अहिराणीतून भाषण करून कसमादे परिसरातील सहकारातील एकमेव वास्तू असलेल्या वसाकालाच ऊसपुरवठा करून ऊर्जितावस्था आणण्याचे भावनिक आवाहन केले, तर वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसाकाचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा बँकेचे संचालक केदा अहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, अभिमन पवार, संजय गिते, माजी संचालक नारायण पाटील, रामदास देवरे, संतोष मोरे, भरत पाळेकर, यशवंत पाटील, बाळासाहेब बिरारी, सुरेश भामरे, अण्णा पाटील शेवाळे, माधवराव पवार, महेंद्र हिरे, संतोष मोरे, बेनिराम चिंचोरे, अॅड. एकनाथ पगार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, यशवंतराव शिरसाठ, मविप्रचे संचालक अशोक पवार, डॉ. प्रशांत देवरे, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, साहेबराव सोनवणे, संदीप सोनावणे, लालचंद सोनवणे, किशोर कदम, कौतिक पगार, विलास देवरे, जितेंद्र पगार, डॉ. पोपट पगार, राजेंद्र पवार, रामदास बागुल, संजय बिरारी, कारभारी पवार, विष्णू बोरसे, नंदकुमार खैरनार, माणिक निकम, मधुकर वाघ, कुबेर जाधव, राजलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष जगन पाटील, संचालक दिनेश देवरे, मजूर संघाचे अध्यक्ष सतीश देशमुख, पंकज निकम आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांनी केले, तर आभार ज.ल. पाटील यांनी मानले.
वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:36 IST