शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

संत समागमचा शोभायात्रेने शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:09 IST

लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा नृत्य करणारे आदिवासी तरुण-तरुणी आणि आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये प्रसन्न मुद्रेने विराजमान माता सुदीक्षाजी यांच्या अतिविराट मिरवणुकीने संत निरंकारी समागम सोहळ्याचा शुभारंभ झाला.

नाशिक : लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा नृत्य करणारे आदिवासी तरुण-तरुणी आणि आकर्षक फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये प्रसन्न मुद्रेने विराजमान माता सुदीक्षाजी यांच्या अतिविराट मिरवणुकीने संत निरंकारी समागम सोहळ्याचा शुभारंभ झाला.चामरलेणीच्या पायथ्याजवळ असलेल्या बोरगड परिसरात शुक्र वारपासून (दि.२४) संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित ५३वा संत समागम सत्संग सुरू झाला आहे. सुमारे चारशे एकर जागेवर आयोजित या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशांतून लाखो भाविक डेरेदाखल झाले आहेत. निरंकारी संप्रदायाच्या प्रमुख माता सुदीक्षाजी यांच्या उपस्थितीत शुक्र वारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध प्रदेशांतील भाविकांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलांचे सादरीकरण करीत संत समागम सोहळ्याला प्रारंभ केला. डोळ्यांचे पारणे फेडणारी संस्कृतीची झलक दाखविणारी भाविकांची पथके शोभायात्रेत पुढे सरकत होती. ‘प्रेमाने बोला धन निरंकार’ असा जयघोष सतत होत होता. अशा भारावलेल्या वातावरणात लाखो भाविक सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर माता सुदीक्षाजींना एका फुलांनी सुसज्जित वाहनामध्ये विराजमान करण्यात आले. भक्तगण त्यांच्यासमोरून अभिवादन करीत, आशीर्वादाची कामना करीत पुढे सरकत होते. अखेरीस सत्संग समितीचे सदस्य, इतर मान्यवर व भक्तगण माताजींना सत्संगस्थळी मुख्य मंडपात घेऊन गेले. नंतर विविध धार्मिक कार्यक्र म झाले. दुपारी माता सुदीक्षाजींनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून सर्वशक्तिमान ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न आपण सत्संगातून करणार असल्याचे सांगितले.भेदभावाच्या भिंती पाडण्याचे आवाहनमानवी मनामध्ये उभ्या राहिलेल्या भेदभावाच्या भिंती पाडून प्रेमाचे पूल बांधावेत. इतरांचे मन दुखवण्यापेक्षा त्यांचे अश्रू पुसण्याचा भाव आमच्या मनामध्ये जागृत व्हायला हवा. आपल्यापरीने शक्य ते कार्य करून पीडितांचे अश्रू पुसण्याची भावना सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये मानवाला द्वेषाची नव्हे प्रेमाची गरज असल्याचे निरंकारी सद््गुरु माता सुदीक्षाजी यांनी त्यांच्या सत्संगात सांगितले.शुक्र वारी ५३व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचे उद्घाटन झाले. तेव्हा मानवतेच्या नावे संदेश देताना त्या बोलत होत्या. या संत समागमाला महाराष्टÑासह जवळपासची राज्ये, तसेच देशाच्या विविध प्रांतांतूनही लाखो भाविक सहभागी झाले आहेत. विदेशातूनही शेकडो प्रतिनिधी आले आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम