शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:10 IST

काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

सिन्नर : काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.  सिन्नर तालुक्यातील वावी येथे राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, प्रभारी सरपंच विजय काटे, मावळत्या सरपंच मंगल वेलजाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  सांगळे यांच्या हस्ते ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना सांगळे म्हणाल्या की, महिलांसोबत संवाद साधता यावा यासाठी वावी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शून्य ते पाच वर्षांच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे आवाहन सांगळे यांनी केले.  यावेळी विठ्ठलराव राजेभोसले, ईलाहीबक्ष शेख, प्रशांत कर्पे, सतीश भुतडा, किरण घेगडमल, दीपक वेलजाळी, आशिष माळवे, विलास पठाडे, कारभारी वेलजाळी, बेबी आनप, नंदा गावडे, प्रतिभा राजेभोसले, दत्तात्रय वेलजाळी, विलास आनप, सुभाष घेगडमल, रवींद्र वेलजाळी, संदीप राजेभोसले, तिष्णा बुकाणे, सुरेखा लोहट, राजू जोरी, राजेंद्र गोराणे, नवनाथ नवले, एस. वाय. कोकाटे, जी. बी. पाटील, आर. के. काळे, संजना पाटोळे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.वावीच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना सिन्नर : शिर्डी महामार्गावरील वावी गाव मध्यवर्ती व महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. वावीचा परिसर मोठा असल्याने व महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने वावी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा वावी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर सांगळे यांनी वावी येथे ग्रामीण रुग्णालय गरजेचे असल्याचे मान्य करीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, डॉ. मोहन बच्छाव यांना पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव मंजूर करून तातडीने जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे व आपण आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही सांगळे यांनी वावी ग्रामस्थांना दिले. जिल्ह्यात ३१५४ बूथ जिल्ह्यात २८ जानेवारी हा दिवस पोलिओ रविवार म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी जिल्हा आरोग्य विभागाकडून चार लाख १४ हजार ९६ लाभार्थी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी आठ हजार १०९ आरोग्य कर्मचारी, ६३४ पर्यवेक्षक कार्यरत होते. जिल्ह्यात ३१५४ बूथवर शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येत होते. त्यानंतर ३०, ३१ जानेवारी व १ फेबु्रवारी रोजी घरभेटी देऊन बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. रविवारी जिल्ह्यात वाड्या-तांड्यांवर बालकांना डोस पाजण्यासाठी १३७ मोबाइल पथक होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद