उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. येथे लाल कांद्यास सर्वोच्च ३१०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे, तर दिवसभरात समितीत ७६ वाहनांमधून सुमारे दीड हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.येथील बाजार समितीतर्फे दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. त्याचप्रमाणे यावर्षीही शुभारंभ करण्यात येऊन प्रथम लिलावासाठी आलेल्या बैलगाडीतील कांदा मालाची पूजा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण बाफणा यांच्या हस्ते करण्यात आली.
कांदा लिलावाचा शुभारंभ
By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST