शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नमामि गोदा फाउंडेशनचा शुभारंभ : प्रदूषणमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 20:35 IST

‘मी या नाशिकचा भूमिपुत्र असून, गोदावरीचा सेवक आहे. गोदामाईला निरोगी व निर्मळ ठेवणे हे माझे कर्तव्यच असून, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार अन् इतरांनाही प्रवृत्त करणार...’ असा संकल्प नमामि गोदा फाउंडेशनच्या शुभारंभप्रसंगी नाशिककरांनी केला.

नाशिक : ‘मी या नाशिकचा भूमिपुत्र असून, गोदावरीचा सेवक आहे. गोदामाईला निरोगी व निर्मळ ठेवणे हे माझे कर्तव्यच असून, त्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार अन् इतरांनाही प्रवृत्त करणार...’ असा संकल्प नमामि गोदा फाउंडेशनच्या शुभारंभप्रसंगी नाशिककरांनी केला.गोदावरी सन्मान आणि तिच्या प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ची स्थापना केली असून, त्याचा शुभारंभ शनिवारी (दि.१९) विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक, लोकप्रतिनिधींनी गोदावरीला शुद्ध व निर्मळ बनविण्याची प्रतिज्ञा केली. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अभिनेता चिन्मय उद््गीरकर, धनश्री क्षीरसागर, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, मिलिंद दंडे, अ‍ॅड. शिरिष दंदणे, सुमित ओढेकर, प्रा. राम कुलकर्णी, सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय नद्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारी पातळीवर नमामि गंगा, नमामि नर्मदासारखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे; मात्र  गोदावरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे फ ारसे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे जनसामान्यांनी ‘नमामि’ शब्दाला प्रामाणिक राहून प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाचा शुभारंभ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, गोदावरी नदी ही दुसºया क्रमांकाची  नदी असून, या नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत त्र्यंबकेश्वर ते नाशिकपर्यंत संपुष्टात आणले गेले. यामुळे गोदावरीचा प्रवाह धोक्यात सापडून नाशिककरांची गोदामाई मृतशय्येवर पोहचून ‘आयसीयू’मध्ये दाखल झाली आहे. नाशिककरांनी पुढाकार घेत ‘नमामि गोदा’ची स्थापना के ली ही भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. गोदावरी नदीवरील श्रद्धा व निष्ठेचे स्मरण करून प्रामाणिकपणे कार्य करत चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा, असे आवाहन राजेंद्रसिंह यांनी यावेळी केले.