शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

दूरकळवाडीत आठवडे बाजाराचा शुभारंभ

By admin | Updated: December 2, 2015 23:13 IST

सोय : गिरणा खोऱ्यातील ग्रामस्थांची गैरसोय झाली

 कळवाडी : मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या आठवडे बाजाराचा अखेर शुभारंभ झाला. यामुळे कळवाडीसह परिसरातील गावांची आठवड्यातील बाजाराची मोठी सोय झाल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. कळवाडीच्या सरपंच पुष्पा मरसाळे यांच्या हस्ते वानरदेवाची पूजा करून आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच पुष्पा मरसाळे यांनी ग्रामस्थांबरोबर भाजीपाला खरेदीचा आनंद लुटला. गिरणा खोऱ्यातील मोठ्या लोकसंख्येने गाव म्हणून कळवाडी प्रसिद्ध असून, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, बॅँका, शेतकरी संघ, जलसंपदा विभागाचे कार्यालय, पोलीस औटपोस्ट, दूध डेअरीकरिता प्रसिद्ध आहे. बाजारासाठी काही लोकांना मालेगाव आणि चाळीसगाव येथे जावे लागत होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच पुष्पा मरसाळे यांनी केले. परिसरातील शेतमजुरांना आठवडे बाजारासाठी दर सोमवारी सुटी मिळावी, अशी मागणी भाजपाचे संदीप देसले यांनी केली आहे. (वार्ताहर)