सटाणा : तालुक्यात सोमवारी (दि.२५) कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या १६२० कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्राचाही शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, डॉ. शशिकांत कापडणीस उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या १२८७ तर ३३३ खासगी आरोग्य कर्मचारी अशा १६२० कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांची कोविन या ॲपवर त्यांची नोंदणी करण्यात आली असून सध्या १००० लस उपलब्ध झाल्या आहेत. दररोज १०० कर्मचारी यांना डोस दिले जाणार आहेत. दुस-या टप्प्यात नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. सोमवारी ज्येष्ठ आरोग्य कर्मचारी मीना तुळशीराम पाटील यांना पहिली लस देण्यात आली.रुग्णालयाची पाहणीदिवसभरात १०० कर्मचारी यांना लस देण्यात आली असून लस दिलेल्या कर्मचारी यांना एक तास ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, आमदार बोरसे यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून अधिकारी ,कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी आरोग्य विभागाचे किरण शेवाळे, पंकज गायकवाड आदी उपस्थित होते.
सटाण्यात कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:25 IST
सटाणा : तालुक्यात सोमवारी (दि.२५) कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या १६२० कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.
सटाण्यात कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ
ठळक मुद्देएक हजार लस उपलब्ध : १६२० कर्मचाऱ्यांना देणार लस