शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

By admin | Updated: July 14, 2014 00:33 IST

अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

सिन्नर : राज्य परिवहन मंडळाच्या येथील आगारातील एका महिला वाहकाने जमा केलेले ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र अखेर दीड वर्षाने मिळाले. मात्र त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघासह विविध संघटना व व्यक्तींना संघर्ष करण्याची वेळ आली. येथील वावी वेस भागात राहणारे मधुकर देवराम आढाव (६६) हे दीड वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथून सिन्नरकडे येणाऱ्या बसमधून प्रवास करीत असताना महिला वाहकाने त्यांचे ज्येष्ठ नागरिकत्वाचे ओळखपत्रात चुकीचे वय असल्याची शंका व्यक्त करीत ते जमा केले होते. त्यांना त्यावेळी बस भाड्यात सवलतही देण्यात आली नाही. त्यानंतर प्रवास करताना त्यांना ओळखपत्र नसल्यामुळे भाड्यातील सवलतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी वाहकाने जमा केलेले ओळखपत्र मिळावे यासाठी येथील बस आगारात अनेक चकरा मारल्या. तथापि, त्यांचे ओळखपत्र आमच्याकडे जमा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जात होती; मात्र त्यांना माहिती असूनही ओळखपत्र जमा नसल्याचे सांगितले जात होते. त्यांनी महिला वाहकाने ते जमा केल्याचेही सांगितले. मात्र तरीही त्यांना ओळखपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती. ज्येष्ठ नागरिक आढाव यांना न्याय मिळावा म्हणून येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक-अध्यक्ष मु. शं. गोळेसर यांनी या प्रकरणी एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केले. सदर ओळखपत्र मिळाले म्हणून येथील वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र जाजू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी देवा सांगळे यांनीही आगार व्यवस्थापकांकडे प्रयत्न केले. याबाबत लोकमतने आवाज उठविल्याने एस.टी. महामंडळाने त्याची दखल घेतली. त्यामुळे महिला वाहकाने जमा केलेले ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र मध्यंतरी पुन्हा परत करण्यात आले. (वार्ताहर)