शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा शनिवार गाजला

By admin | Updated: February 19, 2017 00:50 IST

प्रचार फेऱ्या, चौकसभांचा दणदणाट

सिडको : महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात येण्यास चोवीस तासांचा कालावधी शिल्लक असल्याने व त्यातही औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने शनिवारी सिडकोत सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनी परिसर गाजला. सकाळपासून प्रत्येक प्रभागात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेऱ्या काढून खऱ्या अर्र्थाने प्रचाराची पर्वणी साधून घेतली तर काही उमेदवारांनी रविवारी अंतिम प्रचार फेरीचे नियोजन केले.  नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तसेही उमेदवारांना पुरेसा कालावधी मिळाला नाही, त्यातच प्रभागाचा विस्तार व मतदारांची संख्या पाहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारासाठी आवश्यक असले तरी, ते अल्प कालावधीमुळे शक्य होऊ शकलेले नाही. औद्योगिक वसाहत असलेल्या सिडको व सातपूर येथे ८० टक्के कामगार वर्ग असून, त्यांच्या कामांच्या वेळा पाहता, त्याच्या आधारे प्रचाराची वेळ ठरविण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, पक्षाची उमेदवारी घेणे, छाननी, माघारीचा कालावधी पाहता सिडको, सातपूरमधील सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचारासाठी गेला शनिवार हाती लागला, त्यावेळीही सर्वपक्षीय उमेदवारांनी संधी साधून घेतली. प्रचाराच्या शेवटच्या शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह प्रचार फेऱ्या काढण्यावर भर दिला. प्रमुख रस्ते, चौकांत काही उमेदवारांनी चौकसभा घेऊन आपल्या उमेदवारीमागची भूमिका विशद करून प्रभागातील प्रमुख समस्या व प्रश्नांचा ऊहापोहही केला. याच दरम्यान, जवळपास सर्वच उमेदवारांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून रिक्षाद्वारे प्रचारावरही भर दिला. या प्रचारात चौक सभांवरही भर देण्यात आला. पॅनलमधील उमेदवारांनी एकत्र येत छोटेखानी सभा घेत उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शनिवारचा दिवस असल्याने बहुतांशी कंपनी कामगार घरीच असल्याने त्यांनीही उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. उद्या रविवारी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून, त्यानिमित्ताने दिवसभर प्रचार रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.