शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस महिला मृतदेहांना ‘त्या’ देतात अखेरचा ‘गुस्ल’

By admin | Updated: October 16, 2016 01:58 IST

मानवसेवा : एक तपापासून हमिदा बाजीने जोपासला वसा

 अझहर शेख नाशिकइस्लाम धर्मात अंत्यसंस्काराच्या पद्धतीमध्ये ‘गुस्ल’ अर्थात स्नानाचा विधी हा फार महत्त्वाचा मानला जातो. पुरुष असो अथवा महिला त्यांच्या मृतदेहांना धार्मिक नियमानुसार अत्यंत बारकाईने अखेरचे स्नान घालणे बंधनकारक असते; मात्र बेवारसांचे बाबतीत असे अपवादानेच घडते. अशा बेवारस महिला मृतदेहांचाही अखेरचा प्रवास विधीवत व्हावा, या उद्देशाने वडाळारोडवरील एक महिला गेल्या एक तपापासून मृतदेहांना ‘गुस्ल’ देत अनोखी मानवसेवा करत आहेत.वडाळारोडवरील शिखर सोसायटीमध्ये हमिदा सय्यद (बाजी) राहतात. महिला मृतदेहांना त्यांच्या आई स्नान घालत होत्या. त्यांचे कार्य बघून हमिदा बाजी यांना त्या कार्याची ओळख झाली. तारुण्यात आईसोबत त्या अनेकदा स्नान घालण्यासाठी जात असत. विवाहनंतर २००० सालापासून त्यांनी वारसांच्या महिला मृतदेहांना स्नान घालण्याचे नियम व पद्धती माहीत करून घेतली. कुराणपठण येत असल्यामुळे त्यांना बहुतांश धार्मिक श्लोक मुखोद्गत झाले. त्यामुळे त्यांना महिला मृतदेहांना स्नान घालताना फारशा अडचणी आल्या नाहीत. २००० सालापासून त्यांनी वारसांच्या मयत महिला मृतदेहांना स्नान घालण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम द्वारका येथील संतकबीरनगर येथे एका मुस्लीम कुटुंबामध्ये वृद्ध महिलेचे निधन झाले त्यावेळी त्यांनी या वृद्धेला अखेरचा विधिवत पारंपरिक पद्धतीने स्नान घातले. तेव्हापासून तर आजतागायत त्यांचे हे कार्य सुरूच आहे. दरम्यानच्या काळात जुने नाशिकमधील खडकाळी येथील युवा मल्टिपर्पज अ‍ॅण्ड सोशल ग्रुप या संस्थेने बेवारस मुस्लीम मृतदेहांच्या दफनविधीची जबाबदारी स्वीकारली.