शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कांद्याला २७३१ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:15 IST

येथील बाजारात सोमवारी (दि.९) उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये ते कमाल २७३१ व सरासरी २४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी पाचशे रुपयांनी भाव वाढले.

लासलगाव : येथील बाजारात सोमवारी (दि.९) उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये ते कमाल २७३१ व सरासरी २४५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी पाचशे रुपयांनी भाव वाढले.लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी २१,४८७ क्विंटल कांद्याचा लिलाव होऊन २२२२ रुपये हा सर्वाधिक भाव जाहीर झाला होता. शुक्रवारी किमान १००० ते कमाल भाव २२२२ रुपये व सरासरी भाव २०२० होते. पावसामुळे कर्नाटकमधील नवीन कांदा खराब निघाल्यामुळे इतर राज्यात जाणारा कर्नाटकचा कांदा कमी झाला, परिणामी लासलगावच्या कांदा बाजार समितीतील कांद्याला मागणी वाढून भाव वाढल्याचे दिसत आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे मध्य प्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा गेला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या सहा-सात महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. पाच-सहा महिन्यापासून साठवलेल्या कांद्याचे वजन कमी होते. तसेच साठवणुकीमुळे खराब होणाºया कांद्याला चाळीबाहेर फेकले जाते. त्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली तरी प्रत्यक्ष या तेजीचा फारच कमी लाभ कांदा उत्पादकांना होणार आहे. विंचूर उपबाजार आवारावर बुधवारपासून कांदा लिलाव होणार आहे.आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवार या तिन्ही दिवशी दिवसभर कांदा लिलाव होणार आहे तसेच शेतकरी बांधवांनी आपली चुकवतीची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणेसाठी मालविक्रीस आणताना राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची व आधार कार्डची झेरॉक्स प्रत बरोबर आणावी, असे आवाहनही बाजार समिती सूत्रांनी केले.