लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकतीच लाल कांद्याची विक्र मी आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी मोसमातील सर्वाधिक आवक होऊन ती तब्बल २८ हजार १०५ क्विंटलपर्यंत पोहोचली. एकाच दिवशी लासलगाव बाजार अवारावर एक हजार ६५५ ट्रॅक्टर आल्याने बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे कांद्याच्या सरासरी भावात सोमवारच्या तुलनेत १२५ रुपयांची घट झाली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी लाल कांद्याची सुमारे २८ हजार १०५ क्विंटल आवक झाली होती. बाजारभाव किमान ७०० रुपये, तर कमाल एक हजार ५८, तर सरासरी भाव एक हजार ३०१ रु पये राहिले. (वार्ताहर)
लासलगावला लाल कांद्याची विक्र मी आवक
By admin | Updated: January 1, 2015 00:34 IST