लासलगाव : अमेरिकेतील ‘नासा’च्या तीनदिवसीय प्रशिक्षणासाठी लासलगाव येथील शुभ राणा, दर्शन उगले, रौनक पाटील, अवंतिका पवार, कषक ठाकूर या पाच विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य महेश अय्यर रवाना झाले आहेत.येवला येथील विट्टी इंटरनॅशनल स्कूलमधील पाच मुले व इतर भागातील पाच अशा दहा मुलांचा चमू वैज्ञानिक सहलीसाठी रवाना झाला. अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेण्याचा लाभ या मुलांना लाभणार आहे. ‘नासा’ने अलीकडेच चंद्रावर पाण्याचा व मंगळवार आॅक्सिजन तयार करण्याचा प्रोस्पेक्टर रोबोटिक अभियान मोहीम आखली आहे. या दौऱ्यात या मुलांना अंतराळ संशोधन, स्पेस शटल, अंतराळ स्टेशन, ओरायण या बहुपयोगी अंतराळ यानाबाबत माहिती मिळू शकेल, असे राजू राणा यांनी संगितले. अमेरिकेतील व्हाईट हाऊस, न्यूयार्क येथील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा स्टॅचू आॅफ लिबर्टी, नायगरा फॉल आदि स्थळेही पाहण्याची संधी मिळणार आहे.(वार्ताहर)
‘नासा’च्या प्रशिक्षणासाठी लासलगावचे विद्यार्थी रवाना
By admin | Updated: October 27, 2015 23:29 IST