लासलगाव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांदा आवकेत वाढ झाली. लाल तसेच उन्हाळ कांदा व नवीन रांंगडा कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मंगळवारी १२८० वाहनांतील २४,३६० क्विंटल कांद्याचे लिलाव झाले.लासलगावला २४ हजार ३४ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. किमान भाव २०० ते ६७० रुपये, तर सरासरी भाव ४७० रुपये होते. उन्हाळ कांद्याची आवक ३५८ क्विंटल झाली. भाव किमान १०१ते ३००, तर सरासरी २३० रुपये राहिले. मागील सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ८५,३४४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २५१, कमाल रु पये ७२५, तर सरासरी रुपये ४८० प्रतिक्विंटल होते. उन्हाळ कांद्याची १२६८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १०१, कमाल रु पये ३५९, तर सरासरी रु पये २३० प्रतिक्विंटल होते.
लासलगावला कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:11 IST
लासलगाव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांदा आवकेत वाढ झाली. लाल तसेच उन्हाळ कांदा व नवीन रांंगडा कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. मंगळवारी १२८० वाहनांतील २४,३६० क्विंटल कांद्याचे लिलाव झाले.
लासलगावला कांद्याची आवक वाढली
ठळक मुद्देलासलगावला २४ हजार ३४ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.