शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावला पपईची आवक वाढली

By admin | Updated: November 3, 2015 22:19 IST

लासलगावला पपईची आवक वाढली

लासलगाव : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समिती आवारात सोमवारी पपईची आवक झाल्याने पपईचाही येथे लिलाव करण्यात आला. येथे पपईची आवक सुरू झाल्याने धान्य उत्पादनांसोबतच टमाटे व इतर भाजीपाला पिकांसह डाळींब व पपईसारख्या फळविक्रीसाठी ही बाजारपेठ नावारूपास येत असल्याचे बाजार समिती सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले. बाजार समिती आवारात सोमवारी सोमठाण येथील शेतकरी वसंत घनघाव यांनी ४७ क्रेट्स पपई विक्रीसाठी आणली होती. पपईचा डाळींब खरेदीदारांनी वेगळा लिलाव केला. तत्पूर्वी लासलगाव टमाटा व्हेजिटेबल अ‍ॅण्ड फ्रुट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते पपई क्रेट्सचे पूजन झाल्यानंतर पपईचा लिलाव पुकारण्यात आला. यावेळी मदीना फ्रुट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल कंपनीच्या अडतीत मोहसीन शेख यांनी १,००१ रुपये प्रति क्विंटल दराने पपईची खरेदी केली. याप्रसंगी डाळींब खरेदीदार मधुकर गावडे, मनोज गोरडे, पापा पठाण, शादाब शेख, सुनील शिंदे, मनोज माठा, क्षितिज माठा, बाजार समितीचे मुख्य लिपिक सुरेश विखे, प्रभारी हिरालाल सोनारे, अरुण माळी यांच्यासह डाळींब उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते. येथील बाजार समिती आवारात पपईसोबतच चिकू, सीताफळ, पेरू, बोर आदि शेतमाल प्रतवारी करून विक्रीस आणल्यास या पिकांचाही लिलाव करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी येथे आपला माल विक्रीस आणण्याचे आवाहन टोमॅटो व्हेजिटेबल अ‍ॅण्ड फ्रुट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)