शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत पिण्याच्या पाण्यात आढळल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:40 IST

येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून, महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून,महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. सिडकोत बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन व ड्रेनेज पाइपलाइन एकाच ठिकाणाहून गेलेले असल्याने अनेकदा नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार झाले आहे. असाच प्रकार मंगळवारी सिडकोतील साईबाबानगर परिसरात घडला असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून जंतू, अळ्या, किडे आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांना दिली यानंतर परिसरातील महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यातून आलेले अळ्या, किटके आलेले पाणी दाखविले. या पाण्याला दुर्गंधी येत होती. शहाणे यांनी मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली असता मनपाच्या अधिका-यांनी तत्काळ परिसराला भेट दिली. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी जलवाहिनी तपासणी काम सुरू केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हा प्रकार घडत असल्याने साईबाबानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी संगीता पाटील, सुनंदा हाडोळे, चंद्रकला गायकवाड, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार आदींसह महिला व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण