शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लसीसाठी मोठी सुई ; वेस्टेजमुळे पळता भुई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बालकांच्या लसीकरणासाठी ...

नाशिक : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बालकांच्या लसीकरणासाठी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत असल्याने लसीचे वेस्टेज वाढत असल्याचे दिसून येत आहे. एडी सुईचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागासमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली आहे. राज्यस्तरावरून लसीचा मुबलक पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांचा आकडा वाढला आहे; परंतु हे लसीकरण करण्यासाठी एडी सुईचा वापर केला जात असे. ही सुई केंद्र शासनाने दिली आहे; परंतु सध्या या सुईचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरणासाठी साधारण नियमित वापरली जाणारी २ सीसीची सुई वापरली जात आहे. एकूणात लसींचा तुटवडा असल्याने सध्या तरी त्या पुरत आहेत; मात्र मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांचा हमखास तुटवडा जाणवत आहे.

काय आहे एडी, २ सीसी सिरिंज

एडी सिरिंज म्हणजे ॲटो डिसेबल. ०.५ मि.ली.ची ही सुई एकदा वापरली की, पुन्हा वापरता येत नाही. ही सुई आपोपाप लॉक होते. या सुईतून लस वेस्टेज होत नाही. तर २ सीसी ही सुई नियमितच्या इंजेक्शनची असते. त्यामुळे डोस वाया जातो. ती डिस्पोजेबल आहे.

दररोज २५ हजार सुईंची गरज

जिल्ह्यात दररोज सरासरी किमान २५ ते कमाल ५० हजारांपर्यंत लसीकरण होत आहे. त्यामुळे किमान २५ ते ३० हजार सुईंची आवश्यकता लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून त्या लवकरात लवकर आरोग्य विभागाकडे आणि तिथून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडे त्या सुयांचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.

एडी सुईचा तुटवडा असल्याने स्थानिक पातळीवर २ सीसी सुईची खरेदी करण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार आहे.