शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

By admin | Updated: July 24, 2016 22:56 IST

मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

 द्याने : द्यानेसह मोसम नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून, रात्री व पहाटेच्या वेळेला वाळू चोरी केली जाते. पोलीस प्रशासन व महसूल विभाग कारवाई करतात व दंडाची रक्कम वाळूमाफिया एका रात्रीतून वसूल करतात. आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेतीसिंचनासह तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याचा प्रसंग मोसम खोऱ्यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भीती व्यक्त होत आहे.मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्या विहिरींच्या काही फुटाच्या अंतरावर अवैध वाळू उपसण्याचा गंभीर प्रकार राजरोस सुरू असतानाही महसूल यंत्रणेचे डोळे बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नामपूर शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. मोसम परिसरात आत्ताच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक भागात विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येने अनेक ठिकाणी डोके वर काढले आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी मोसम नदीचे आवर्तन हाच एकमेव मार्ग आहे. या आवर्तनाचा फायदा नदीकाठच्या गावांना व पाणीपुरवठा योजनांना होतो. परंतु खुलेआम वाळू उपशामुळे मोसम नदीची वाट लागली असून, नदीत पडलेल्या दहा ते पंधरा फुटांच्या खड्ड्यांमुळे विहिरींची पाण्याची पातळी घटत चालली आहे. नदीपात्रातील वाळू उपसा असाच सुरू राहिल्यास आगामी काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर येणार आहे. कारण यावर्षीही पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरित्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे. हा प्रकार प्रशासनापासुन लपलेला नाही. हे सर्व माहीत असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मूकसंमती असल्याचे म्हटले जात आहे. शासकीय विकासकामे करण्याच्या नावाखालीही वाळूचा प्रचंड उपसा होत आहे. वास्तविक ठेकेदार निविदा भरताना शासकीय दराने वाळूचे दर निविदेत सादर करतो. तरीही अनधिकृतपणे नदीपात्रातील वाळू शासकीय कामासाठी वापरून शासनाची फसवणूक केली जाते. मात्र वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली आहे. महसूल विभाग व वडनेर खाकुर्डी, जायखेडा पोलीस प्रशासनाने रात्री गस्त घालून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्ग व नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)