लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वोक्हार्ट हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागातून चोरट्यांनी डॉक्टरांचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ डॉ़ रुषीश तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २७ जून रोजी दुपारी १ ते सव्वातीन वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांचा ३० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप तळमजल्यावरील बाह्यरुग्ण विभागातील सात नंबरच्या खोलीमध्ये ठेवलेला होता़ चोरट्यांनी हा लॅपटॉप चोरून नेला़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़