शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीकडून ‘कंदील’ भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:38 IST

महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नाशिक : महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.विशेष म्हणजे, राष्टÑवादीचे आंदोलन सुरू असताना महावितरणचे कार्यालयच संपूर्ण काळोखात बुडालेले असल्यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले, तर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता पोलिसांनी कार्यालयाभोवती वेढा दिला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कंपनीने शहर व परिसरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असून, उद्योगधंद्यांना तेजीच्या काळात मंदीचा सामना करावा लागत आहे. आॅक्टोबर हीटमुळे अगोदरच नागरिक उष्णतेने घामाघूम झालेले असताना त्यात विजेच्या लपंडावाने आणखीनच भर पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.त्यानंतर शहर अभियंता तायडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यात पुरेशी वीज आहे त्यामुळे नाशिक शहरात भारनियमन होणार नाही असे महावितरणने जाहीर केलेले असतानाही विजेच्या तुटवड्याचे कारण दाखवून नाशिककरांना काळोखात लोटण्यात आले आहे. भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरू असून, अभ्यासासाठी कंदील व मेणबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शहरातील भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर चिटणीस संजय खैरनार, गौरव गोवर्धने, प्रशांत खरात, डॉ. अमोल वाजे, अ‍ॅड. सुरेश आव्हाड, डॉ. चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.