शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणच्या जमिनी बेकायदेशीर शासनजमा

By admin | Updated: March 23, 2017 01:59 IST

नाशिक : मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी इनामाच्या जमिनी शासन जमा करताना केलेला आदेशच संदिग्ध असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून पवार यांचा आदेश रद्द ठरविला आहे.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील कथित जमीन घोटाळ्याचा आधार घेऊन महसूल विभागाला अडचणीत आणण्याची खेळी खेळू पाहणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला बागलाणच्याच जमिनींसंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या एका निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी इनामाच्या जमिनी शासन जमा करताना केलेला आदेशच संदिग्ध असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून पवार यांचा आदेश रद्द ठरविला आहे. नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या  खरेदी-विक्री व्यवहाराला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कोट्यवधी रुपयांचा शासनाचा नजराणा बुडविल्याच्या कारणावरून नांदगावचे तत्कालीन तहसीलदार, प्रांत, मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह २२ व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. मुळात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची ही कारवाई महसूल कायद्यात हस्तक्षेप करणारी व बेकायदेशीर असल्याचे मत राजपत्रित महसूल अधिकारी महासंघाने व्यक्त करून या कारवाईविरोधात आंदोलनही केले होते. त्यामुळे चिडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महसूल खात्याच्या एकूणच जमीनविषयक प्रकरणे तपासून पाहण्याचा निर्णय घेऊन तशा कागदपत्रांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जानेवारी २०१५ रोजी काढलेल्या एका आदेशाची प्रत तसेच कळवण, बागलाण व सुरगाणा या तीन तालुक्यांतील जमीन व्यवहारांची लेखी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मागून महसूल विभागावर आपला दबाव वाढविला होता. ज्या बागलाणमधील जमिनींच्या व्यवहाराची माहिती घेऊन महसूल खात्याला अडचणीत आणण्याची खेळी लाचलुचपत विभागाने आखली होती, नेमकी तीच खेळी महसूल खात्याने उडवून लावली आहे. मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून जमीन शासनजमा केली होती. त्याच्या विरुद्ध जमीन मालक जगदीश दामोदर पाटील, दोधा राजाराम गोयकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले असता, त्यांचे अपील वैध ठरविण्यात आले. अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संदिग्ध असल्याचे नमूद करून जमीन शासनजमा करताना मालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही असे ताशेरेही ओढण्यात आले आहेत. त्यामुळे या जमिनींच्या व्यवहाराच्या आड महसूल अधिकाऱ्यांभोवती कारवाईचा फास आवळू पाहणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला चांगलीच चपराक बसली आहे. संशयिताना  निकालाचा लाभज्यांच्या जमिनी शासनजमा करण्यात आल्या, त्यांच्याकडून नजराणा रकमेची अनामत भरून घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पाहता, नांदगावच्या कथित जमीन घोटाळ्यात नजराणा रकमेचा अपहार वा कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या संदर्भात दाखल केलेला गुन्हा फक्त याच एका आधारावर दाखल करून घेण्यात आला होता; मात्र पूर्णत: महसूल अधिनियमान्वये होणाऱ्या जमिनींच्या व्यवहारात अनेक तरतुदी असून, त्याचा कोणताही विचार न करता हा गुन्हा दाखल झाल्याने आता संशयिताना नेमका त्याचाच लाभ खटल्यात मिळेल, पर्यायाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे हसे होण्याची शक्यता आहे.