शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा धरणातील जमीन मूळ मालकांना परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

▪️ जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले आदेश. देवगाव : त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बांधण्यात आलेल्या अपर वैतरणा ...

▪️ जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले आदेश.

देवगाव : त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बांधण्यात आलेल्या अपर वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी वापराविना पडून असलेली ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन स्थानिक मूळ मालक असलेल्या व ज्या जमिनी शेतकरी स्वत: कसत आहेत, मात्र त्या जमिनी आजही शासनाकडे संपादित आहेत अशा जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

वैतरणा धरणातील विनावापर पडीक असलेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळावी यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे जलसंपदामंत्र्यांनी या बैठकीत महसुली विभागातील व जलसंपदा विभागातील महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत येत्या दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथे मंत्रालयात झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रामुख्याने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील धरणांची स्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रामुख्याने जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात अशा सूचना दिल्याची माहिती खोसकर यांनी दिली.

वैतरणा धरणात संपादित झालेल्या जमिनींपैकी वापरात नसलेल्या आणि स्वत: शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. अपर वैतरणा धरणाच्या कामासाठी अतिरिक्त एकूण ६२३ हेक्टर जमीन संपादन केलेली आहे. ही जमीन अद्यापही शासनाच्या नावावर आहे. मात्र, ही जमीन स्थानिकांना देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांच्या उताऱ्यावर आजही शासनाचे नाव आहे, ते काढून मूळ मालक असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे नाव लावण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मूळ मालक असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना स्वमालकीची जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात येईल, अशी आशा खोसकर यांनी व्यक्त केली.