चांदवड : येथील भूमिअभिलेख कार्र्यालयातील संगणक यंत्रणा व भारत दूरसंचारचे देयक अदा न केल्याने सर्वच आॅनलाइन कामकाज बंद पडले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून ३०० रुपये किमतीचे चलन आॅनलाइन भरण्याचा फतवा निघाल्याने मोजणी फी, नकला, नकाशे, घराचे व मालमत्तेचे उतारे काढण्यासाठी आॅनलाइन चलन भरावे लागते. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे आॅनलाइन फॉर्म भरण्याचे काम बंद पडले आहे. संगणक व इंटरनेट सुविधा वरिष्ठांनी लक्ष घालून त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
भूमिअभिलेखचे कामकाज ठप्प
By admin | Updated: January 7, 2016 22:42 IST