शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना अंधारात ठेवून रस्त्यासाठी भूसंपादन

By admin | Updated: November 26, 2015 23:22 IST

शिंदे : नाशिक - सिन्नर रुंदीकरणाचा तिढा बांधकाममंत्र्यांच्या पुढ्यात

नाशिक : नाशिक ते पुणे दरम्यान रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या शिंदेगावातील जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध असताना प्रत्यक्षात भूसंपादन सुरू झाल्याची माहिती बांधकाममंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांनी दिली आणि ग्रामस्थ अवाक् झाले. कोणतीही नोटीस मिळाली नाही की पत्र नाही. मग भूसंपादन सुरू कसे झाले, असा प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित केला. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन अहवाल सादर करावा, असा असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे.नाशिक-पुणे मार्गाचे रुंदीकरण नाशिक ते सिन्नर या महत्त्वाच्या टप्प्यात रखडले आहे. शिंदे आणि सिन्नर मार्गावरील काही शेतकरी तसेच रहिवाशांचा त्यास विरोध आहे. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. शिंदेगाव येथे रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या क्षेत्रात अनेक घरे जात असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे. दरम्यान, याच मार्गावर असलेल्या माळेगाव भागातील सहा विहिरी रुंदीकरणात बाधित होत असून, त्यापैकी तीन विहिरींना भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. या विहिरी सिन्नर तालुक्यात विविध गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्तठरल्या आहेत. अन्य विहिरी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, डॉ. विलास बोराडे, विठ्ठल सांगळे, प्रमोद सोंजे तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.