शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उपयुक्तता असेल तरच आरक्षित जागांचे भूसंपादन

By admin | Updated: May 7, 2017 00:04 IST

नाशिक : आरक्षित जागा संपादित करताना खातरजमा करून घेण्याचे निर्देश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एखादी आरक्षित केलेली जागा मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय होत नसल्यास आणि त्याची उपयुक्तता नसेल तर अशा आरक्षित जागा संपादित करताना खातरजमा करून घेण्याचे निर्देश शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार, मिळकत विभागाने नगररचना विभागाकडून अशा प्रकरणांची माहिती मागवितानाच संपादित करावयाच्या आरक्षित जागांचा प्राधान्यक्रमही मागविला आहे.नाशिक शहरात १९९३ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार ५४६ आरक्षणे आहेत. त्यात भूसंपादनाने ताबा प्राप्त झालेल्या आरक्षणांची संख्या ५७ असून, वाटाघाटीद्वारे ताबा प्राप्त झालेल्या आरक्षणांची संख्या ५५ आहे. याशिवाय टीडीआरद्वारे ६९६ आरक्षणे भागश: ताब्यात आलेली आहेत. त्यात डी.पी.रोडचाही समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ३० आरक्षणे ही व्यपगत झालेली आहेत. एकूण आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला नवीन भूसंपादन कायद्यानुसार सुमारे साडेचार हजार कोटी रुपये लागणार आहेत. दरम्यान, शासनाच्या नगरविकास विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून, त्यात एखाद्या आरक्षणाची जागा ताब्यात घेताना ती मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार अनुज्ञेय होत आहे किंवा नाही तसेच त्या जागेचा खरोखरच विकास करणे शक्य आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घेण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. बऱ्याचदा विकास नियंत्रण नियमावलीनुसार जागा अनुज्ञेय होत नसल्यास अशा जागा ताब्यात आल्यावरही विनाविकास पडून राहतात व कालांतराने त्यावर अतिक्रमण होत असते. त्यासाठीच शासनाने आरक्षित जागांच्या उपयुक्ततेबाबत खातरजमा करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नगररचना विभागाकडे आरक्षित करावयाच्या जागांचा प्राधान्यक्रम मिळकत विभागाने मागितला आहे.