शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातून महिलेची पोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

दिंडोरी येथील चंद्रभागा संपत शेवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे. शेवाळे या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.३१) दुपारी ...

दिंडोरी येथील चंद्रभागा संपत शेवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे. शेवाळे या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.३१) दुपारी परतीच्या प्रवासासाठी सीबीएस बसस्थानकात दिंडोरी येथे जाण्यासाठी त्या कळवण बसमध्ये चढत असताना गर्दींची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांची पोत हातोहात लांबविली.

---------

सिडकोत टोळक्याची मारहाण

नाशिक : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. या घटनेत टोळक्याने लोखंडी रॉडचा वापर केल्याने एक जण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश राजाराम चौधरी,गणेश प्रकाश चौधरी,चंद्रकांत राजाराम चौधरी व पवन अर्जुन चौधरी (रा.शिवशक्ती चौक,सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संजय राजाराम महाकाळ यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे शेजारी असून महाकाळ यांची लहान मुले अंगणात खेळत असताना संशयितांनी त्यांच्या अंगावर पाणी टाकून शिवीगाळ केली. याबाबत महाकाळ यांनी जाब विचारला असता ही घटना घडली.

-------

पाय घसरून पडल्याने मृत्यू

नाशिक : घरात पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंजली संजय जोशी (वय ५०, रा.जोशीवाडा) असे मृत महिलेचे नाव आहे. जोशी या बुधवारी (दि.३१) सायंकाळी घरकामात व्यस्त असताना अचानक पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.