शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कहांडळवाडी येथे दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST

वावी परिसरात कहांडळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केली. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

वावी परिसरात कहांडळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केली. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रहिवासी भास्कर तुकाराम कहांडळ हे आपल्या राहत्या घरी झोपेत असताना मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने घरात प्रवेश केला. बेडरूममधील सामान, कपाटातील असलेले जवळपास साडेतीन तोळे सोने लंपास केले. त्याचबरोबर भास्कर कहांडळ यांच्याकडील खिशात असलेले सात हजार रुपये व त्यांच्या पत्नी यांच्या पर्समध्ये असलेले अडीच हजार रुपये असा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला. सदर घटना ही सकाळी उठल्यानंतर कहांडळ यांच्या पत्नी यांच्या लक्षात आली. मागील दरवाजाची कडी वाकवून चोरट्यांनी प्रवेश केला. सकाळी उठल्यानंतर घरातील बेडरूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पाहून कहांडळ यांच्या पत्नीने कपाटातील दागिन्यांचा बॉक्स चेक केला असता त्यातील सर्व दागिने या चोरट्यांनी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत भास्कर कहांडळ यांनी पोलीस ठाण्यात खबर देऊन सदर घटना कळविली. त्यावर वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश गवळी, दशरथ मोरे, नितीन जगताप, प्रकाश उंबरकर अधिक तपास करीत आहेत.

फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले.