शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब; नाशिक विभागाला एक कोटीचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 20:52 IST

जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्‍याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत्रयोदशीलाच एक कोटी रुपयांचा फटका

ठळक मुद्देनाशिक विभागातून ६ हजार १४६ कर्मचार्‍यापैकी ४३३९ चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी

नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. शहराची सकाळ सत्रात तीस टक्के वाहतूक वगळता बससेवा पूर्णपणे ठप्प राहिल्याने महामंडळाला सुमारे एक कोटीचा आर्थिक फटका धनत्रयोदशीला बसला. दिवसभरात केवल ४३६ फेर्‍या होऊ शकल्या. विना हंगामी ९० हजारांचे दिवसाला नाशिक विभागाला उत्पन्न मिळते; मात्र हंगाम असल्याने एक कोटीचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने कबूल केले.शहर बस वाहतुकीच्या सुमारे तीन हजार फेर्‍या तर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या सुमारे पाच हजार ८४७ फेर्‍या नियोजित होत्या; मात्र केवळ ४३६ बसेस धावल्या तर शहर बस वाहतुकीच्या सकाळ सत्रात २५ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावल्या. एकूणच सकाळच्या सत्रातही केवळ वीस टक्के प्रवासी वाहतूक निमाणी स्थानकातून झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत सर्वच बसेसला ‘ब्रेक’ लागलेला होता. जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्‍याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत्रयोदशीलाच एक कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. एकूणच राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब झाली. संपामध्ये सहभागी झालेल्या चालक-वाहकांसह कर्मचाºयांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र रात्रीपर्यंत एकही कर्मचारी सेवेत हजर झाला नाही. दरम्यान, संपात सहभागी नसलेल्या संघटनांच्या पदाधिकार्‍यानी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. नाशिक विभागावर संपाचा तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले. एसटी कामगार सेना, कास्ट्राईब, संयुक्त कृती समितीचा अपवाद वगळता सर्व संघटना संपामध्ये उतरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रात्री उशिरापर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे.

चार हजार चालक-वाहक संपावरनाशिक विभागातून ६ हजार १४६ कर्मचार्‍यापैकी ४३३९ चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे तर संपात एकूण सात संघटना सहभागी असून, सहा हजार कर्मचारी सहभागी असल्याचा दावा एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. इंटक, एस.टी. महामंडळ मेकॅनिक युनियन, मेकॅनिक-कंडक्टर युनियन, मोटार कामगार फेडरेशन, संघर्ष ग्रुप, विदर्भ एसटी कामगार संघटना, राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना संपात सहभागी आहेत.

टॅग्स :StrikeसंपST Strikeएसटी संप