शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाख काय, दहा हजारही देण्यास असमर्थ

By admin | Updated: June 16, 2017 00:07 IST

लाख काय, दहा हजारही देण्यास असमर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने खरीप पीककर्जासाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बॅँकांना दिलेले असले आणि तातडीची मदत म्हणून दहा हजारांची खरिपासाठी मदत जाहीर केलेली असली तरी यातील एक रुपयाही शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही, असे सांगत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने पीककर्ज वाटपासाठी ‘हात’ वर केले आहे.दरम्यान, शासनाने सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असला तरी कर्जमाफीसाठी टाकलेल्या नियम-निकषात जिल्ह्णातील सुमारे ८० टक्के शेतकरी वंचित राहण्याची चिन्हे आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शासनाला लेखी स्वरूपात पत्र पाठवून खरिपासाठी पीककर्ज वाटपाला अनुदान नसल्याने शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येणार नसल्याचे कळविले आहे. तसेच शासनाने खरिपासाठी तातडीची जाहीर केलेली दहा हजारांची मदतही देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे क्लिअरिंग बंद असून, सुमारे अडीच हजार कोटींची पीककर्ज वसुली थकलेली असल्याने जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे खरिपासाठी लाखाचे सोडा, दहा हजाराचे पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. तसेच राज्य शिखर बॅँकेने जिल्हा बॅँकेच्या असलेल्या सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी दिल्या तरी थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे तूर्तास जिल्ह्णातील शेतकऱ्यांना व जिल्हा बॅँकेच्या शेतकरी सभासदांना खरीप कर्जासाठी शासनाकडून जिल्हा बॅँकेला अनुदान उपलब्ध झाले तरच पीककर्ज मिळण्याची आशा आहे.