शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओंच्या मानधन वाटपात लाखोंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:10 IST

नाशिक : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंच्या (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) मानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय घेतला जात असून, दोन वर्षांपासून बीएलओ शासनाचे मानधन जर घेत आहेत, तर मग मतदार याद्यांचे काम का होत नाही, अशी शंका घेऊन करण्यात आलेल्या चौकशीतून फसवणूक झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. विशेष म्हणजे, सरकार दप्तरी नोंद असलेल्या बीएलओंना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर त्याची दखल न घेतली गेल्याने या बीएलओंच्या अस्तित्वाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देकाम न करताच वाटप मालेगाव, नाशिकचा समावेश

नाशिक : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंच्या (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) मानधन वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय घेतला जात असून, दोन वर्षांपासून बीएलओ शासनाचे मानधन जर घेत आहेत, तर मग मतदार याद्यांचे काम का होत नाही, अशी शंका घेऊन करण्यात आलेल्या चौकशीतून फसवणूक झाल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. विशेष म्हणजे, सरकार दप्तरी नोंद असलेल्या बीएलओंना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर त्याची दखल न घेतली गेल्याने या बीएलओंच्या अस्तित्वाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात आठवडाभरापूर्वीच बीएलओंच्या मानधन वाटपात घोटाळा केल्याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखलकरण्यात आला असल्यामुळे प्रशासनाने ही सारी बाब अधिक गांभीर्याने घेतलीआहे.  त्यांचा सर्वाधिक संशय मालेगाव व नाशिक शहर मिळून सुमारे दीड हजार बीएलओंवर व त्यांना मानधन अदा करणाऱ्या निवडणूक नायब तहसीलदार व कर्मचाºयांवर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेऊन त्यासाठी मतदान केंद्रनिहाय ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नाही अशांच्या घरोघरी जाऊन त्यांची छायाचित्रे गोळा करणे, तर ज्या मतदारांचे यादीत कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र गोळा करण्याचे काम बीएलओंना सोपविले होते. त्यासाठी प्रत्येक बीएलओना त्यांच्या नेमणुकीच्या मतदान केंद्रातील मतदारांची यादी पुरविण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील मालेगाव व नाशिक शहरातील चार असे पाच विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य दहा मतदारसंघांतील बीएलओंनी सदरचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जे मतदार सापडले त्यांची छायाचित्रे गोळा करून निवडणूक यंत्रणेकडे सुपूर्द केली; परंतु मालेगाव बाह्ण मतदारसंघातील एकाही बीएलओने काम केले नाही, तर नाशिकमधील पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली या चार मतदारसंघांतही जेमतेम काम होऊ शकले आहे. यासंदर्भात वारंवार निवडणूक नायब तहसीलदारांना सूचना करूनही त्यांच्याकडून बीएलओ काम करीत नसल्याची सबब देण्यात आली. परिणामी आयोगाने दिलेली मुदत टळूनही मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्यावर यासंदर्भातील संशय अधिक बळावला आहे.