शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लाखो मराठा नाशिकहून मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:12 IST

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे.

नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी नाशिकमधून लाखो मराठा मोर्चेकरी मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईकडे रवाना झाले असून, हा ओघ बुधवारी (दि.९) सकाळी मोर्चा सुरू होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून, मुंबईकडे जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.आझाद मैदानात धडकणाºया या मोर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचे समन्वयक समितीने स्पष्ट केले असून, नियोजन समिती पथकांसह समन्वय समितीचे कार्यकर्तेही मंगळवारी सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहे. वीर जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात होऊन आझाद मैदानापर्यंत पोहोचणाºया मोर्चात सर्व मोर्चेकरी सहभागी होणार असून, मुंबईत क्रांतिदिनी निघणारा मराठा क्रांती मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’, असा निघणार असल्याचा दावा नाशिकच्या समन्वय समितीने केला आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाही राज्यभरात झालेल्या ५७ मूक मोर्चांप्रमाणेच मूक स्वरूपाचा असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. मराठा क्रांती मोर्चा बुधवारी सकाळी ११ वाजता वीर जिजामाता उद्यानापासून सुरू होईल. हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात पोहोचणार आहे. याठिकाणी समाजातील काही निवडक कन्या मोर्चाला संबोधित करणार आहे. यात राज्यभारतील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून समाजाची भूमिका मांडणाºया समाजकन्यांचा समावेश असणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एका समाजकन्येची निवड करण्यात आली असून, केवळ नाशिकमधून दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. या समाजकन्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आझाद मैदानावरील व्यासपीठावरून कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार आहेत. तसेच मराठा समाजाची भूमिकाही मांडणार आहेत.