शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:01 IST

शहरात घरफोडी सत्र सुरू असून, दिवाळीसाठी घरी परतणारे कुटुंबीय जसजसे घरी परतत आहेत तसतशा घरफोड्या झाल्याचे समोर येत आहेत़ शहरातील विविध तीन ठिकाणी घरफोडींच्या घटना उघडकीस आल्या असून, यामध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे़

नाशिक : शहरात घरफोडी सत्र सुरू असून, दिवाळीसाठी घरी परतणारे कुटुंबीय जसजसे घरी परतत आहेत तसतशा घरफोड्या झाल्याचे समोर येत आहेत़ शहरातील विविध तीन ठिकाणी घरफोडींच्या घटना उघडकीस आल्या असून, यामध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे़  आडगावच्या निवृत्तिनगर परिसरातील शरयू पार्क परिसरातील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ राजेंद्र रघुनाथ पितृभक्त (५६, रा़ फ्लॅट नंबर २, गणेश प्राइड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि़२९) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा लॉक तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरात ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, चार तोळे वजनाची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅम वजनाचे सात वेढे व रोख रक्कम असा एक लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमधील रविकिरण कॉलनीतील एका घराचे खिडकीचे गज कापून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ साई संकुल रो-हाउसमधील रहिवासी भटेंद्रनाथ पंडितराव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरातील २५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, पाच व तीन ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, आठ ग्रॅमचे कानातील झुबे, सहा ग्रॅमचे सोन्याचे वेल, दोन ग्रॅम वजनाची सटी, पन्नास ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पट्ट्या व रोख रक्कम असा एक लाख ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरफोडीची आणखी घटना गणेशनगरमध्ये घडली आहे़ मंत्री अपार्टमेंटमधील रहिवासी डॉ़ नीलेश लीलाधर फुलझले हे २१ ते २८ या कालावधीत दिवाळीनिमित्त भंडारा येथे गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा व लॅचचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़