शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविक सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ

By admin | Updated: April 20, 2016 00:46 IST

भक्तांच्या सेवेसाठी सरसावले हजारो हात : मालपुरे परिवाराची अन्नदानाची २२ वर्षांपासून अविरत सेवा

कळवण : रथ काय चालना, चालना वणी ना गड ले, बोल सप्तशृंगीमाता की जय, अशा गाण्याच्या तालासुरात वाजत गाजत, नाचत लाखो देवी भक्तांचे पाय मजलदरमजल करीत कळवणमार्गे नांदुरीगडाकडे मार्गस्थ झाले. कळवण शहरातील रस्ते देवी भक्तांनी फुलून गेल्याने मिनिटा-मिनिटाला वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने रस्ता एकेरी झाला आहे. कळवणला महाप्रसाद तर भेंडी येथे उसाचा रस वाटप करण्यात येत असून, लाखो देवीभक्तांनी याचा लाभ घेतला.रामनवमीपासून सुरू झालेल्या चैत्रोत्सवाच्या चौथ्या दिवसाअखेर लाखो भाविकांनी तर आज सोमवारी देवीभक्तांनी सकाळपासून एकच गर्दी करून लाखाहून अधिक भाविक आदिमायेच्या चरणी लीन झाले. लाखो भक्तांनी महाप्रसादाचा भोजनालयात लाभ घेतला असून, आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली.कळवण ते नांदुरी रस्ता भाविकांनी फुलून गेला असून, रणरणत्या उन्हाची पर्वा न करता आदिमायेच्या दर्शनाची आस ंघेऊन देवीभक्त सप्तशृंगगडाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या ४८ तासात लाखो भाविक मार्गस्थ झाल्याचा अंदाज असून, ठिकठिकाणी देवीभक्तांच्या सेवेसाठी दानशूर समाजधुरिणांनी अन्नदान, रस, फराळ, पाणीवाटप, आरोग्य सेवा यांसह महाप्रसादाचे आयोजन केले आहे. विठेवाडी-कळवण-नांदुरी या रस्त्यावर विविध संस्था, संघटना, मित्रमंडळांकडून देवीभक्तांना मदतीचा हात मिळत असून, माणुसकीची प्रचिती अनुभवास येत आहे. कळवण येथील दानशूर व्यक्तिमत्त्व मधुकर मालपुरे, कमको संचालक संजय मालपुरे, माजी सरपंच अजय मालपुरे व मालपुरे परिवार २२ वर्षांपासून देवीभक्तांची अन्नदानाच्या माध्यमातून अखंड सेवा करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मालपुरे परिवाराच्या दातृत्वप्रेमापोटी देवीच्या दर्शनासाठी कळवणमार्गे पायी जाणारे देवीभक्त मालपुरे यांच्या गुदामावरील भंडाऱ्यात हमखास हजेरी लावून पुढे मार्गस्थ होतात, हा आजवरचा इतिहास असून, चैत्रोत्सव कालावधीत मालपुरे परिवारासह त्यांचा मित्र परिवार व हितचिंतकांचे शेकडो हात देवीभक्तांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात.३५ ते ४० अंश सेल्सिअस तपमानातही देवीभक्तांचा अलोट सागर उन्हातान्हाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर मजलदरमजल करीत अनवाणी पायी यात्रा करणाऱ्या देवीभक्तांच्या संख्येत यंदाच्या वर्षी कमालीची वाढ झाली आहे. तशी दातृत्ववानामध्ये देखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. विठेवाडी ते कळवण व कळवण ते नांदुरी या पायवाटेच्या मार्गावर अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, फळे वाटप, उसाचा रस, सरबत, आईस्क्रीम वाटपामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, देवीभक्तांच्या सेवेसाठी दातृत्व मंडळींमध्ये जणू स्पर्धा लागली असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)