शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मुस्लीम कब्रस्तानमध्ये सेवा-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:17 IST

दोन वर्ष उलटूनही महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा दिलेल्या नाहीत

ठळक मुद्दे दोन वर्ष उलटूनही महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा दिलेल्या नाहीत महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा अद्याप दिलेल्या नसल्याने मुस्लीम समाज बांधवांमध्ये नाराजीचा सूर

नाशिक : दफनविधीसाठी सिडको मस्जिद ट्रस्टला पाथर्डी शिवारात दिलेल्या जागेत सहा महिन्यांत सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा करार महापालिकेने फेब्रुवारी २०१६ मध्ये केला होता. मात्र, दोन वर्ष उलटूनही महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा दिलेल्या नाहीत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने पाथर्डी शिवारातील १२ हजार चौरस मीटर क्षेत्र मुस्लीम कब्रस्तानचे वापरासाठी सन २०१३ मध्ये कब्जा पावतीने सिडको मस्जिद ट्रस्टला ताब्यात दिलेले आहे. त्यानंतर महापालिका आणि सिडको मस्जिद ट्रस्ट यांच्यात १६ फेब्रुवारी २०१६ मध्ये करारनामा झाला. करारनाम्यानुसार कब्रस्तानसाठी जागेची लेव्हलिंग करणे, जागेचे वॉल कंपाउंड करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, पुरेसे विजेचे खांब बसविणे, स्वतंत्र वीजपुरवठा पुरविणे, स्वतंत्र पाणी कनेक्शन देणे, जनाजा ठेवण्यासाठी जागा, नमाज पठणासाठी योग्य त्या मोजमापाचे हॉल, वजूखाना, स्वच्छतागृह आदी सुविधा करारनाम्याच्या तारखेपासून सहा महिन्यांत देण्याचे महापालिकेने स्पष्टपणे लिहून दिलेले आहे. तसेच जनाजा नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही महापालिकेने स्वीकारलेली होती. मात्र, महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा अद्याप दिलेल्या नसल्याने मुस्लीम समाज बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. सदर ठिकाणी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मान्य केलेल्या सर्व सेवासुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह नागरिकांनी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.