शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेमडिसिव्हर, अ‍ॅक्टेमरा इंजेक्शनचा शहरात तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:02 IST

नाशिकरोड : कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व अ‍ॅक्टेमरा या इंजेक्शनचा नाशिक शहरात हेतुपुरस्करपणे कृत्रीम तुटवडा निर्माण करून काळया ...

ठळक मुद्देशिवसेनेची तक्रार: औषध प्रशासनाला निवेदन

नाशिकरोड : कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व अ‍ॅक्टेमरा या इंजेक्शनचा नाशिक शहरात हेतुपुरस्करपणे कृत्रीम तुटवडा निर्माण करून काळया बाजारात विक्री केली जात आहे अन व औषध प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व औषधे बाजारात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या नाशिक शहरात कोविड रुग्णांचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढत आहे. परिणामी या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसिव्हर व अ‍ॅक्टेमरा या दोन इंजेक्शनची मोठया प्रमाणात आवश्यकता भासत आहे. परंतु कोविड रुग्णांवर उपचार करणाºया रुग्णालयांकडेच या दोन्ही औषधांची कमतरता दाखविली जात आहे. परिणामी ही औषधे आणणेकामी रुग्णालये नातेवाईकांकडे मागणी करीत असतात. मात्र शहरात ही दोन्ही औषधे सहजतेने नागरीकांना उपलब्ध होत नाही. मात्र काही ठराविक ठिकाणी ही औषधे त्यांच्या किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा किंमतीला उपलब्ध होत आहे. मात्र यामुळे या नातेवाईकांना मोठया आर्थिक भूर्दंडांला सामोरे जावे लागत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक यामुळे कर्जबाजारी देखील झालेले आहे. मध्यंतरी आपल्या विभागामार्फत या औषधांचा तुटवडा नसल्याचे प्रसिध्द करुन शहरातील काही औषध एजन्सीची नावे प्रसिध्द करण्यात येवून या ठिकाणी ही औषधे मिळेल असे जाहिर करण्यात आलेले होते. मात्र अनेक नागरीकांना सदरचे ठिकाणी औषधे मिळाले नसल्याची तक्रारी आहे.सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या जिवाशी खेळणारी व नातेवाईकांच्या सहनशिलतेचा अंत पहाणारी अशी आहे. यामुळे कोविड रुग्ण तसेच नातेवाईक यांच्या मनात प्रशासन व शासन यांच्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत आहे. सदरचे औषधाचा पुरेसा व सुरळीत पुरवठा करुन तो कोविड रुग्णालयांपर्यंत पोचवणे अत्यंत गरजेचे आहे.सर्व बाबींची गंभीर दखल घेवून या औषधांचा काळा बाजार करणाºया विक्रेत्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून उपरोक्त औषधे सुलभतेने व योग्य किंमतीत उपलब्ध होणेकामी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे, सुनील गोडसे, रोशन आढाव, राकेश जाधव, अनिकेत गांगुर्डे आदींच्या स'ा आहेत.कोरूना ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमेडेसिव्हर, अ‍ॅक्टेमरा या इंजेक्शन सोबत इतर अत्यावश्यक औषधांचा तुटवडा लवकरच दुर करून काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. तसेच अनियमितता करणा-या मेडिकल वर सुध्दा कठोर कार्यवाही करण्यात येईल. सदरचे इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास प्रशासन तातडीने उपलब्ध करून देईल.- माधुरी पवार, सहाय्यक आयुक्त 

 

टॅग्स :Healthआरोग्यFDAएफडीए