शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाचा अभाव : व्यावसायिकांनी भरली रक्कम दुकाने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:28 IST

सिडको : जुने सिडको भागातील सुमारे ५०हून अधिक व्यापाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी रक्कम भरूनही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सुमारे १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले.

ठळक मुद्देआॅनलाइन तक्रार असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एक ते दीड एकर जागेवर सिडको प्रशासनाचा ताबा

सिडको : जुने सिडको भागातील सुमारे ५०हून अधिक व्यापाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी रक्कम भरूनही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सुमारे १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले. सिडकोकडे जागेचे पैसे भरल्यानंतर तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही केवळ महापालिका व सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे दुकाने हटविल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे तसेच आॅनलाइन तक्रार असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जुने सिडको येथील १८ दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. परंतु जुने सिडको येथे व्यवसाय करणाºया व्यावसायिकांनी गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी सुमारे ५०हून अधिक व्यापाºयांनी सिडको प्रशासनाकडे जागेसाठी रक्कम भरलेली असून, त्याबदल्यात सिडकोने जागा दिल्याचे पत्र (अ‍ॅलॉटमेंट लेटर)देखील व्यावसायिकांना दिलेले आहे. जुने सिडको येथे सुरू असलेल्या दुकानांच्या जागेसह परिसरातील सुमारे एक ते दीड एकर जागेवर सिडको प्रशासनाचा ताबा आहे. तसेच सातबारा उताºयावरही सिडकोचेच नाव असून, सदरची जागा ही सिडकोची असल्याचे सिडको प्रशासकांकडून सांगण्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही महापालिकेने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून बुधवारी (दि.१६) दुकानांचे अतिक्रमण हटविल्याने व्यापाºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला असतानाही मनपा प्रशासनाने न जुमानता अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू ठेवत १८ दुकाने भुईसपाट केली. यात अनिल हेअर कटिंग, मिलन टायर वर्क्स, मिलन फेब्रिकेशन वर्क्स, आर. के. स्विट्स, माय चॉइस टेलर, महाराष्टÑ हार्डवेअर, सप्तशृंगी किराणा, भामरे मिसळ, डिसूझा वॉच हाउस, मुक्तार गॅरेज, मोबिन फॅब्रिकेशन, गणेश अ‍ॅल्युमिनियम आदींसह १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.