शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:42 IST

राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे

ठळक मुद्देशेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहेगोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लासलगाव (नाशिक), दि. 30 -  राज्यातील शेतकरी चांगले शेती उत्पादन घेतले असला तरी त्याच्या पदरी भाव मिळत नाही. त्यामुळे कांद्यासह अन्य शेतीमालाला ई मार्केट संकल्पनेत आणून नियोजनबद्ध पाणी, सोलरसह वीज व चांगल्या बाजारपेठेसाठी राज्यभर 50 कोल्ड स्टोरेजची शृंखला निर्माण करण्यात येत आहे. तसेच गोदावरी खोऱ्यात 28 टीएमसी शाश्वत पाणी देत मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, अहमदनगर यातील पाणी वाद मिटविण्याकरिता केंद्र सरकारकडून 12 हजार कोटींवर निधी आणला जाईल. जिल्ह्यातील येवला, सिन्नर व चांदवड या दुष्काळी तालुक्यांत 12 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रेल्वेचे देशातील पहिल्या पाच कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ओनियन कोल्ड स्टोरेजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  हस्ते तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह मंत्री महोदयांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.

 सभेत गोंधळाचा प्रयत्न  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात कृषी कर्जमाफीबद्दल येवला येथील संतू पाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पाच- दहा मिनिटे सभेत गोंधळ सुरू झाला. त्यावेळी फडणवीस यांनी भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत आपल्या कार्यक्रमाचे वेळी मीडियाने लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर यावी म्हणून असा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. लोकांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे आणि टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे म्हणताच उपस्थित हजारो महिला पुरुषांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजवित साथ दिली. या वेळी शेतकरी घोषणाबाजी होत असताना जोरदार आवेशात भाषण करीत या घोषणा बाजीराव चोख प्रत्युत्तर देत आपल्या कुशल भाषण सामर्थ्याची चुणूक दाखवित सेवा अवघ्या पाच मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले.