शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:47 IST

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.

ठळक मुद्देकांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी संतोष रामेश्वर आट्टल (येवला ) आणि ओमप्रकाश राका (लासलगाव) यांच्यासह शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथील निवासस्थानी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कोल्हापूर येथे समक्ष भेट घेऊन या प्रश्नी निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊा चर्चा केली.सदरचा निपाह हा रोग केरळच्या ठरावीक जिल्ह्यात व विशिष्ट भाजीपाला व फळांवर आहे. कांदा हा महाराष्ट्राच्या मातीत पिकतो. त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नाही. असे निर्यातदार संघटनेच्या वतीने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर खासदार राजू शेट्टीव सदाभाऊ खोत यांनी थेट दिल्ली स्थित केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटून त्यावर तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले.निपाह हा व्हायरस वाटवाघळामुळे फळांवर आणि फळातून माणसात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजीपाला आणि फळांवर कुवेतने बंदी घातली आहे. याचा निर्यातीवर परिणाम होत असून शासनाने निपाहच्या प्रतिबंधाबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. शेतमालाची निर्यात बंद झाली तर शेती व शेतकरी अडचणीत येतील असेही बोलले जात आहे.केरळच्या ठरावीक जागी सिमित असणाºया निपाह विषाणूच्या भीतीने कुवेतने कांदा व भाजीपाल्याची कोंडी केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुवेतप्रमाणे अन्य देशदेखील भारताच्या भाजीपाला, कांदा यावर बंदी घालू शकतील. केंद्र व राज्य शासनाने याबाबत गंभीर होऊन परिस्थिती हाताळावी.- नंदकुमार आट्टल,कांदा व्यापारी, येवला बंदीच्या संकटामुळे निर्यातदार धास्तावले असून, कांद्याचे भावदेखील एका कंटेनरला लाख रु पयांनी कमी झाले आहेत. कुवेतची निर्यात चालू असताना कांद्याला ८०० ते १००० रु पयापर्यंत भाव होते. हा माल आता अन्य देशात वळवावा लागत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा भावालादेखील उतरती कळा लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.- संतोष आट्टल, राज्य निर्यातदार संघटना प्रतिनिधी, येवला