शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा तर ‘फरवरीत’ आहे ना ?

By admin | Updated: January 22, 2015 01:02 IST

राज्यमंत्र्यांचे असेही ज्ञान : तुम्हीच सांगा किती वर्षांनी येतो कुंभमेळा? आमचे सरकार पॉझिटिव्ह आहे..

.नाशिक : ‘पुढच्या महिन्यात म्हणजेच ‘फरवरीत’ कुंभमेळा आहे ना? मग गोदावरी स्वच्छ होऊन जाईल. आमची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून, लवकरच तुम्हाला रिझल्ट दिसेल. (मध्येच मंत्रिमहोदयाच्या कानात आॅगस्टमध्ये कुंभमेळा असल्याचे सांगितले जाते.) ओके ओके...! मला सांगा तुम्ही सर्वजण नाशिकचे आहात ना ! मग हा कितवा कुंभमेळा आहे? (मध्येच साहेब दर बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो) हो काय? मग चिंतेचे कारण नाही. सर्व समस्यांचे निराकरण होईल. हे बघा आमचे सरकार पॉझिटिव्ह आहे, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नांचे आम्ही उत्तर देऊ. फक्त जादूच्या कांडी फिरविल्यासारखी अपेक्षा धरू नका...एका दमात सर्वच ज्ञान प्रकट करणाऱ्या उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांंची वाणी ऐकली आणि मंत्रिमहोदयांच्या या सामान्यज्ञानावर (?) काय बोलावे हे कोणासही सुचेना!कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मंत्र्यांंचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. पालकमंत्री, सहकार राज्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्या पाठोपाठ उद्योग राज्यमंत्री यांनी नाशिकमध्ये दौरा आयोजित केला होता. अर्थातच त्याचे निमित्त होते ते नाशिकमधील उद्योगांना भेटी आणि मुख्यत्वे करून ज्या गंगा गोदावरीत कुंभमेळा होणार आहे त्या गोदावरीचे प्रदूषण थांबविणे! दुपारी साडे तीन वाजता नाशिकमध्ये पोहचून त्यांची सातपूर- अंबडच्या औद्योगिक क्षेत्रात भ्रमंती होणार होती. तथापि, त्यांचे नाशिकमध्ये आगमनच मुळी पावणेसात वाजता झाले. अशा ‘उत्तर सायंकाळी’ कसली पाहणी आणि कसली गोदापात्रात न्हाणी? स्वत:च विलंबाने आलेल्या मंत्रिमहोदयांना त्यांच्या व्यस्ततेमुळे पाणी देण्यास विलंब झाल्याने त्याचा राग संबंध नाशिककरांवरच काढत त्यांनी नाशिकमध्ये पाणी उशिरा दिले जात काय असा प्रश्न केला.शासकीय विश्रामगृहावर पोहचल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या औद्योगिक संघटनांचे निवेदन स्वीकारले आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाविषयी चर्चा करणाऱ्यांना त्यांनी आपल्याच खात्यात येत असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे सांगून आता आपण या भ्रष्टाचाराचा नायनाट करू अशी ग्वाही स्वत:हूनच दिली. इतकेच नव्हे तर नंतर आपल्या कडव्या (?) शिस्तीचा परिचय देण्यासाठी प्रदूषण मंडळात अधिकारी-कर्मचारी किती असे थेट कोडे स्थानिक अधिकाऱ्यांना टाकले. महोदयांचा दरारा बघून भांबावलेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत चर्चा सुरू केली आणि ३२ चा आकडा सांगितला खरा; परंतु त्यामुळे महोदय जाम संतापले. अधिकाऱ्यांंचे ज्ञान किती सामान्य आहे, अशा आशयाने हजेरी घेतली. नंतर पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी आपलेच ज्ञान प्रकट केले. कुंभमेळा फरवरीत आहे ना या त्यांच्या खास विदर्भाच्या शैलीमुळे उपस्थित अधिकारी थक्क झाले. पुढे आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी बहुधा त्यांनी नाशिककर तुम्हीच सांगा कधी कुंभभेळा भरतो ते.. दहा वर्षांनीच ना... असे सांगितल्याने सारेच अंचबित झाले. काही काळजी करू नका, कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी साफ होईल, अशी घोषणाही त्यांनी करून टाकली. (प्रतिनिधी)