शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:07 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने समाजाने दबावतंत्राचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने समाजाने दबावतंत्राचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय भरतीप्रक्रिया होऊ देणार नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’चा एल्गार केला आहे. सरकारने नरमाईची भूमिका घेतल्यानंतर आंदोलनाची आक्रमकता आणखी वाढली असून, हजारो कार्यकर्ते पंढरपूरमध्ये ठाण मांडून असताना नाशिकमध्ये सोमवारी (दि.२३) पाथर्डी फाटा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री आषाढीला पंढरपूरमध्ये महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाले.  त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून नाशिकमधील हजारो मराठा तरुण पंढरपूरमध्ये अजूनही दबाव ठाण मांडून असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते सोमवारी (दि. २३) शहरातील विविध भागात गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार आहेत. राज्यात परळीसह विविध भागात आक्रमक आंदोलन सुरू असताना नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोचातर्फे पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भजन कीर्तन करून मराठा आरक्षणासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार आहे. या आंदोलनात पाथर्डी फाटा परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील पंचक्रोशीतील कार्यकर्ते सहभागी होणार असून, सोमवारी (दि.२२) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशाप्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा समाजाच्या विविध संघटना सहभागी होणार असून, शहरातील अन्य भागांतही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा